चिचडोह बॅरेज जवळ चार तरुणांना जलसमाधी, पोहण्याचा मोह बेतला जीवावर

0
 चिचडोह बॅरेज जवळ चार तरुणांना जलसमाधी, पोहण्याचा मोह बेतला जीवावर


अशोक खंडारे मुख्य संपादक

चामोर्शी:-
चामोर्शी शहरापासून दोन कि मी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेज जवळील असलेल्या खोल पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार युवकांना जलसमाधी मिळाली आहे सदर घटना ३.३० ते ४ वाजता चे दरम्यान घडली 
मृतकाचे नाव मोनू त्रिलोचन शर्मा वय २६ रा.गडचिरोली (चामोर्शी येथे स्टाईलचे दुकान आहे), प्रफुल्ल विठ्ठल येलूरे वय २०,महेश मधुकर घोंगडे वय २०, शुभम रुपचंद लांजेवार वय २४ हे रा.आशासदन टोली चामोर्शी असे असून मृतक व काही मीत्र चिचडोह बॅरेज येथे पार्टी करण्यासाठी गेले होते.५ मित्रांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही व ते नदीपात्रातील पाण्यात आंघोळीसाठी उतरले त्यातील एक जन पाण्यात बुडायला लागला म्हणून त्याला वाचवण्यासाठी गेले  मात्र तो वाचला पण वाचवण्यासाठी गेलेले चार जणांना जीव गमवावा लागला.
घटनेची माहिती चामोर्शी पोलीसांना मिळताच पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, पोलीस उपनिरीक्षक सुधिर साठे, तुषार पाटील व पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन जीवाची पर्वा न करता स्वतःला दोरखंड बांधून पाण्यात एक तास शोधमोहीम राबविली परंतू यश आले नाही त्यानंतर स्थानिक युवकांनी त्यांना मदत केली व त्या चारही मृतकाचे शव पाण्याबाहेर काढले लगेचच ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे शवविच्छेदन करण्यासाठी  दाखल करण्यात आले व शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आले. घटना स्थळाला भेट देऊन आ.डॉ. देवराव होळी यांनी त्यांचे सांत्वन केले.
सदर घटनेमुळे चामोर्शी शहरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !