अजून घेतला बळी सुरजागडच्या ट्रकने

0
अजून घेतला बळी सुरजागडच्या ट्रकने

आष्टी :-


सुरजागड लोहप्रकल्पाच्या ट्रक ने अजून एक बळी घेतल्याची घटना आज दि.५/८/२०२३ ला सायंकाळी शांतीग्राम गावा जवळ घडली आहे
मृतक प्रदीप दिवाकर पातर वय २२ रा ईलूर (, आष्टी)  हे लगाम येथील आनंद रॉय यांच्या हार्डवेअर च्या दुकानात फवारणी पंप दुरुस्ती चे मिस्त्री चे काम करीत होता दररोज प्रमाणे दुकान बंद करून मालकाचे घरी रामपूर बोरी येथे दुचाकीने जात असताना मागे येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार व अन्य दोन तरुण खाली कोसळले  मात्र मृतक प्रदीप यांच्या डोक्यावरून चाक गेल्या मुळे तो जागीच गतप्राण झाला  त्यांच्या सोबत असलेले दोन जन जखमी झाले आहेत  त्या अपघातामधील सुनील गंगाराम ठाकरे याला अहेरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर दुसरा गंभीर जखमी आनंद रॉय याला आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
आनंद रॉय यांनी आपले हार्डवेअर चे दुकान बंद करून दोन्ही कामगारांना आपल्या दुचाकी  क्रं एम एच ३३ यु १२९२ ने रामपूर ,बोरी येथील  स्वगावी घेऊन जात असताना अज्ञात सुरजागडच्या ट्रकने मागेहून धडक दिली  व सदर अपघात झाला आहे   
घरातील कर्ता मुलगा मरण पावल्याने त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे लोहखनिज प्रकल्पाने मृतकाचे कुटुंबास 
तात्काळ सानुग्रह मदत करावी अशी मागणी ईल्लूर वासीयांनी केली आहे 
 मात्र परिसरातील नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की लायड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड कंपनी ला लोहखनिज वाहतूक करण्याची लीज दिली आहे की लोकांचे जीव घेण्याची दीली आहे असे सुरजागड चे वाहण अजून किती जीव घेणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे

गावातील होतकरू मुलगा असा अपघाती मरण पावल्याने ईल्लूर गावात हळहळ व्यक्त होत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !