उत्कृष्ट "लोकप्रतिनिधी पुरस्कार" साखरा (काटली) येथील उपसरपंचा अर्चना बोरकुटे यांना जाहीर

0
 उत्कृष्ट "लोकप्रतिनिधी पुरस्कार" साखरा (काटली) येथील उपसरपंचा अर्चना बोरकुटे यांना जाहीर 


दिल्ली येथील समारंभात ३ डिसेंबरला होणार वितरीत 

गडचिरोली :- उत्कृष्ट "लोकप्रतिनिधी पुरस्कार"साखरा (काटली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा अर्चना बोरकुटे यांना जाहीर झाला आहे 
गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत साखरा (काटली)येथील उपसरपंचा अर्चना बोरकुटे यांना गाव स्तरावरील महिला सक्षमिकरण, ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करणे तसेच गाव विकासाचे दृष्टीने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन दिल्ली यांनी बोरकुटे यांच्या कार्याची दखल घेऊन "उत्कृष्ठ लोकप्रतिनिधी पुरस्कार" जाहीर केला आहे. सदर पुरस्कार दिनांक- ०३ डिसेंबर २०२३ ला दिल्ली येथील समारंभात रामदास आठवले केंद्रीय मंत्री, अर्जुन राम मेघवाल, आदीला फाऊंडेशन दिल्लीचे डॉ. एस. आदिनारायण, डॉ. राजीव मेमन, डॉ. मनिष गवई यांच्या उपस्थितीमध्ये सदर पुरस्कार ग्रामपंचायतीच्या साखरा येथील उपसरपंचा अर्चना बोरकुटे यांना देण्यात येणार आहे. बोरकुटे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या सदस्या कांचन चौधरी, जयमाला मेश्राम, दिनेश चौधरी, अश्विनी जनबंधू, मित्र परिवार व गावातील समस्त जनतेंनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !