ब्रेकिंग न्यूज वैनगंगा नदीपात्रात रेतीत पुरुन ठेवलेल्या मृत्तदेहाचा आष्टी पोलीसांनी लावला छळा

0
ब्रेकिंग न्यूज 
 वैनगंगा नदीपात्रात रेतीत पुरुन ठेवलेल्या मृत्तदेहाचा आष्टी पोलीसांनी लावला छळा


 आष्टी :-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रामपूर (कढोली) येथील बेपत्ता झालेल्या एका इसमाचा मृतदेह गावालगतच असलेल्या वैनगंगा नदीपात्रात रेतीत पुरुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा इसम २३ नोव्हेंबर पासून बेपत्ता होता त्याचा शोध नातलगांनी केला पण त्याचा थांगपत्ता लागू न शकल्याने दोन दिवसांनंतर दि.२५ नोव्हेंबरला बेपत्ता असल्याची माहिती आष्टी पोलीसांना दिली होती.
नातलग तथा गावकऱ्यांनी शेतीशिवारात शोध घेतले असता सुंदरची एक चप्पल गावातीलच शेतकरी आनंदराव डोंगरे यांच्या शेतात आढळून आली होती 
त्यावरून आष्टी पोलिसांनी शोध घेतला असताना दि .२८ नोव्हेंबर रोजी चक्क त्याचा मृतदेह वैनगंगा नदीच्या पात्रात रेतीमध्ये पुरुन ठेवल्याचे निदर्शनास आले.
मृत्तदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी डॉक्टरला पाचारण करून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. व त्याच ठिकाणी सदर व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यात आला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे 

 सुंदर केशव झाडे वय ४९ वर्षे रा .रामपूर (कढोली) ता.चामोर्शी असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पोलीस स्टेशन आष्टी येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे.


त्याला विद्युत करंट लागल्याने सुंदर याचा मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. परंतु विद्युत करंट लागुन मृत्यू झाला तर वैनगंगा नदीत एवढ्या लांब नेवून त्याला नदीत पुरले व घटनास्थळापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीतील वाळूमध्ये कोणी नेऊन पुरले असेल अशा शंकाना पेव फुटले आहे.
या घटनेचा तपास आष्टी पोलीस मोठ्या बारकाईने करीत आहेत लवकरच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडतील यात काही शंका नाही.


प्रतिक्रिया 
रामपूर (कढोली) जवळील वैनगंगा नदीच्या पात्रात सुंदर झाडे याचा पुरून ठेवलेला मृत्तदेह आढळून आला आहे. त्याचा मृत्यू विद्युत करंट लागुन झाला आहे असे दिसून येते पण करंट कसा लागला व त्याला वैनगंगा नदीच्या पात्रात कुणी पुरले यात शंका निर्माण झाली आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यू कशामुळे झाला हे कळेल . पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक कुंदन गावडे 
पोलिस स्टेशन आष्टी

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !