चितरंजनपूर येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर तिन गंभीर जखमी

0
चितरंजनपूर  येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर तिन गंभीर जखमी


दोन दुचाकींच्या आमोरासमोर धडकेनंतर ट्रकने केली कमाल

आष्टी:-
चितरंजनपूर ( येनापूर) ता . चामोर्शी जि गडचिरोली येथे एका विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर तिन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.२७ नोव्हेंबर ला दुपारी दिड ते दोन वाजताचे दरम्यान घडली
मृतकामध्ये रामेश्वर गंगाधर कुंभमवार वय ३८ रा.अनखोडा व रियांशा धनराज वाढई वय ८ वर्षे रा. जामगीरी असे असुन  रामेश्वर हा आपल्या दुचाकी क्रं.एम.एच.३४ ए डब्ल्यू.५९२४ ने त्यांचे सोबती प्रकाश निलकंठ नागुलवार वय ३२ रा अनखोडा कडून चामोर्शी कडे जात होते अचानक समोरुन येणारे धनराज वाढइ रा.जामगीरी दुचाकी क्रं.एम.एच.३३ डी.९८७२ ने येनापूर कडे जात असताना दोन्ही विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार पाचही जण रोडवर खाली कोसळले तेव्हा गडचिरोली कडून येणाऱ्या एम एच  ३४ बी .झेड २३७७ या ट्रकच्या  मागच्या भागात रामेश्वर आल्याने ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरुन गेले तेव्हा ते जागीच गतप्राण झाले तर रियांशा हिला जब्बर मार लागला व तिचाही जीव गेला तर निलकंठ नागुलवार, धनराज वाढइ,व एक महिला गंभीर जखमी झाले  लागलीच स्थानिक लोकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र येनापूर येथे उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे
सदर घटनेची माहिती आष्टी पोलीसांना मिळताच पोलिस निरीक्षक कुंदन गावडे हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाचा पंचनामा करून रामेश्वरचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले व रियांशा चा मृतदेह चामोर्शी येथे नेण्यात आला आहे
मृतक रामेश्वर गंगाधर कुंभमवार हे अहेरी येथील रुग्णालयातील १०८ या ॲम्ब्युलन्सचे चालक होते त्यांना दोन मुली पत्नी आई व बराच मोठा आप्त परिवार आहे
दोन दिवसांत दोघांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे अनखोडा गाव शोकसागरात बुडाला आहे
सदर अपघाताचा गुन्हा आष्टी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ट्रक व चालक यांना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात आष्टी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !