वैनगंगा नदीपात्रात नाव बुडाली,सहा महीलांना जलसमाधी

0
 वैनगंगा नदीपात्रात नाव बुडाली,सहा महीलांना जलसमाधी


आष्टी :-
वैनगंगा नदीच्या पाण्यात नाव बुडून सहा महिलांना जलसमाधी मिळाल्याची दुदैवी घटना दिनांक 23 जानेवारी मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपुर रै घाटावर घडली.

जिजाबाई दादाजी राऊत रा. गणपूर ता. चामोर्शी असे जलसमाधी मिळालेल्या महिलेचे नाव आहे हीचे प्रेत मिळाले असुन

रेवंता हरीचंद्र झाडे

मायाबाई अशोक राऊत

सुषमा सचिन राऊत

बुधाबाई देवाजी राऊत सर्व रा. गणपूर रै. या बेपत्ता आहेत तर -सारूबाई सुरेश कस्तुरे या महिलेला वाचविण्यात यश आलें आहे

सदर महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेच्या सहाय्याने जात होत्या. अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे सात महिला आणि नावाडी बुडाले. नावाडी पोहून बाहेर निघून गेले व एका महिलेला वाचविण्यात आले. परंतु सहा महिला बुडाल्या. यापैकी दोन महिलेंचे प्रेत मिळाले असून

चार महिलांचा शोध घेतला जात आहे. चामोर्शी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. शोधमोहीम वेगात सुरू आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !