डोंगरगाव येथे दैनिक 'अचूक निदान 'चा प्रकाशन प्रजासत्ताकदिनी

0
डोंगरगाव येथे दैनिक 'अचूक निदान 'चा  प्रकाशन  प्रजासत्ताकदिनी 


डोंगरगाव (तालुका मंगळवेढा ) :-
शुक्रवार दिनांक 26 जानेवारी  2024 
रोजी सायंकाळी 04 वाजता डोंगरगाव येथे दैनिक 'अचूक निदान 'या दैनिकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला असून या समारंभाचे अध्यक्षस्थान डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे ह्या भूषविणार असल्याची माहिती संपादक डी. के. साखरे यांनी दिली.
    या प्रकाशन समारंभास 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. समाधान आवताडे, मंगळवेढा प्रांत अधिकारी बी. आर. माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, तहसीलदार मदन जाधव, पोलीस निरीक्षक रणजित माने , गटविकास अधिकारी शिवाजी पाटील श्री. विठ्ठल सह. साखर कारखाना पंढरपूर चे चेअरमन अभिजित पाटील, मंगळवेढा युटोपीयन शुगर चे चेअरमन उमेश परिचारक, डॉ. बाबासाहेब देशमुख (सांगोला )डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त डॉ. शिवाजीराव पवार, सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस चे माजी अध्यक्ष अविनाश शिंदे, दैनिक दामाजी एक्सप्रेस चे संपादक दिगंबर भगरे, भाजपा जिल्हा संघटन सचिव शशिकांत चव्हाण, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने, म. न. से. चे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकांत पवार, आर. पी. आय. चे जिल्हाउपाध्यक्ष चिमाजी कसबे, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय गेजगे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, क्रांती ज्योती फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. ज्योती कांबळे व ए आर न्यूज चे संपादक रोहिदास भोरकडे आदिनां निमंत्रीत केले असल्याची माहिती साखरे यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !