पैशाच्या हव्यासापोटी काकूने दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन केले ठार

0

पैशाच्या हव्यासापोटी काकूने दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन केले ठार
 बीड:- 
एका लालची काकुने आपल्याच दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेनंतर बीड गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 
पोलिसांनी आरोपींला बेड्या ठोकल्या असून 20 दिवसांनंतर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. तनूजा वय 2 वर्ष किशोर अमोल भावले वय 13 महिने अशी मृत बालकांची नावे आहेत. स्वाती उमाजी भावले असं आरोपी काकूचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार, ही खळबळजनक घटना 29 डिसेंबर 2023 रोजी घडली होती. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील तनुजा आणि किशोर या दोन भांवडाची पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याचे समोर आले आहे. 29 डिसेंबरच्या दुपारी अचानक उलट्या सुरु झाल्यानंतर दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. किशोरला बीडच्या रुग्णालयात तर तनुजाला छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी दोघांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणात सुरुवातीला तलवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काही दिवसांनी ही घटना हत्येची असल्याचे समोर आले. पोलिसांनी घरात चौकशी सुरु केली आणि तपास करीत असताना त्यांना आरोपींचा शोध लागला
 काही महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हिने आरोपी स्वाती हिचा सासरा सुखदेव भावले याने माझी लेक वैशाली हिला नांदु दिले नाही म्हणून तिने बदला घेण्याचा चंग बांधला होता. त्यांनी बदला घेण्यासाठी सुखदेव ची सुन स्वाती हिला चार लाख रुपयांचे व त्या घरची मालकीण होण्याचे स्वप्न दाखविले तुने तुझ्या पुतण्यांना ठार केल्यास कुनालाही संशय येणार नाही असीही खात्री दिली त्यामुळे सखुबाई च्या आमिश्याला बळी पडून स्वातीने आपल्या दोन लहान चिमुकल्या पुतण्यांना उंदिर मारण्याचे औषध चाटविले
 असे पोलीस चौकशीतून निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.


 सखुबाई भावले आणि स्वाती भावले या दोघींनी संगनमताने कट रचला आणि 29 डिसेंबर 2023 रोजी दुपारच्या सुमारास सखुबाई हिने आणून दिलेले उंदिर मारण्याच्या व्यूबमधील औषध स्वाती हिने बोटाने काढून तनुजा आणि किशोर या दोघांना चाटविले, त्यानंतर त्यांना उलव्या झाल्या आणि उपचारा सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला. अशी तक्रार मयत मुलांचे वडिल अमोल सुखदेव भावले यांनी तलवाडा पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून सखुबाई भावले, स्वाती उमाजी भावले यांच्याविरूध्द कलम 302, 102-ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !