रविंद्रनाथ टागोर हिंदी विद्यालय रविंद्रपूर येथे प्रजासत्ताक दिन साजरा व सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप

0
रविंद्रनाथ टागोर हिंदी विद्यालय रविंद्रपूर येथे प्रजासत्ताक दिन साजरा व सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप आष्टी:-
 26 जानेवारी 2024  ला वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी द्वारा संचालित  रवींद्रनाथ टागोर हिंदी विद्यालय रवींद्रपूर येथे प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकुल सरकार यांनी केले. यावेळी  शाळेचे मुख्याध्यापक  अविनाश भड, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ सुप्रिया सरकार, ग्रामपंचायत सदस्य  सौ. सरस्वती सेन, पोलीस पाटील सौ. प्रतिभा हलदार, जिल्हा परिषद शाळा रवींद्रपूरचे मुख्याध्यापक  महेश सरकार, दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील ज्येष्ठ नागरिक , सामाजिक कार्यकर्ते, शाळेचे सर्व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.  ध्वजारोहण झाल्यानंतर तंबाखू मुक्त अभियानाची शपथ घेण्यात आली. विद्यार्थी आणि मार्गदर्शकांची भाषण  आणि देशभक्तीपर गीत झाल्यावर,  मानव विकास मिशन सत्र 2023-24 अंतर्गत बाहेरगावावरून ये जा करणाऱ्या एकूण सहा विद्यार्थिनींना  मान्यवरांच्या शुभहस्ते  सायकलीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सहाय्यक शिक्षक प्रशांत सरकार, प्रस्ताविक  मुख्याध्यापक अविनाश भड यांनी  तर  आभार प्रदर्शन  जिल्हा परिषद रवींद्रपूर  शाळेचे सहाय्यक शिक्षक संजय मंडल  यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक  सुधीर येगोलपवार. विक्रम हलदार , अनिंद्र हलदार, शिक्षिका सौ निमसरकार आणि  शिक्षकेत्तर कर्मचारी  सुजित बाईन, संजीव हलदार,  रॉय,  मंडल, बहाद्दूर यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !