सरकार भारताचे की,मोदींचे असा प्रश्न उपस्थित करून विकसित भारत संकल्प यात्रेचा अनखोडा येथे अडविला रथ

0
सरकार भारताचे की,मोदींचे असा प्रश्न उपस्थित करून विकसित भारत संकल्प यात्रेचा अनखोडा येथे अडविला रथ


आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावात केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन दिनांक १५ जानेवारी रोजी करण्यात आले व ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनानुसार विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावात आला आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि अनखोडा येथील ग्रामपंचायतीचे सचिव संभाषण करीत असताना गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष तिमाडे यांनी सरकार भारताचे की मोदींचे , शासकीय खर्चातून मोदी हे भाजपचा प्रचार का करतात अशा प्रश्नांचा भडिमार करत शिबिरात ग्रामसेवक बारसागडे यांना चांगलेच धारेवर धरले. तेव्हा त्यांनी शासनाने आमच्या वर जी जबाबदारी दिली आहे त्यामुळे सदर माहिती जनतेला पोहचविण्याचे काम करीत आहोत असे सांगितले 
तिमाडे यांनी यात्रेच्या उद्देशावरच गंभीर असा प्रश्न उपस्थित केला. या घटनेचा व्हिडीओही दुपारनंतर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

केंद्र शासन राज्य शासनाच्या सहकार्याने विविध शासकीय योजनांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम राबवत आहे. या मोहिमेची सुरुवात तालुक्यात झाली आहे. यात्रेचा प्रचार रथ सोमवारी अनखोडा येथे पोहोचला. तेथील ग्रामसेवकांनी निमंत्रित केलेल्या ग्रामस्थांच्या हातात हिरवे झेंडे आहेत ते व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत 
यावर तिमाडे यांनी जोरदार आक्षेप घेतला. योजना भारत सरकारच्या की मोदींच्या असा प्रश्न त्यांनी ग्रामसेवक बारसागडे यांना विचारला होता तेव्हा तात्काळ रथ पुढे घेउन जाण्यात आले 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !