घोट पोलीस मदत केंद्र तर्फे मॅरेथॉन विजेत्यांचा सत्कार

0
घोट पोलीस मदत केंद्र तर्फे मॅरेथॉन विजेत्यांचा सत्कार 


प्रविण तिवाडे/कार्यकारी संपादक

घोट:-
  पोलीस मदत केंद्र घोट च्या वतीने नियमितपणे विद्यार्थ्यांकरिता नवीन उपक्रम राबविले जातात. तसेच स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीची तयारी करण्यात विद्यार्थ्यांना शारीरिक व लेखी परीक्षेकरिता मार्गदर्शन करून त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके देण्यात येत असतात. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करून मार्गदर्शन केले जाते.
     दिनांक 04 /02/2024 रोजी  गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश गोहने यांचे मार्गदर्शनाखाली घोट हद्दीतील एकूण 100 विद्यार्थ्यांना  पाठविण्यात आले. सदर विद्यार्थ्यांची नोंदणी, जाण्याची व येण्याची व्यवस्था पोलीस मदत  केंद्रा तर्फे करण्यात आली होती.
  सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पाच किलोमीटर गटात घोट हद्दीतील मौजा शांतीनगर येथील सुरज बोटरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच दहा किलोमीटर गटात विक्की चलाख याने द्वितीय क्रमांक पटकाविला.
        सदर दोन्ही विजेत्यांना पोलीस मदत केंद्र घोट येथे बोलावून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांनी सत्कार व अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !