वडसा (देसाईगंज) येथे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा तालुका स्तरीय मेळावा

0
वडसा (देसाईगंज) येथे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा तालुका स्तरीय मेळावा 


अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली:-
 रिपब्लिकन पक्ष आजही तळागाळातील जनतेच्या मनात रुजलेला असून अशाच लोकांच्या बळावर हा पक्ष पुन्हा एकदा वाढणार आहे. अशी अपेक्षा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकत्याच वडसा येथे झालेल्या तालुकास्तरीय मेळाव्यात व्यक्त केली.

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत व वडसा (देसाईगंज) तालुकाध्यक्ष श्यामराव वालदे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा उत्साही वातावरणात पार पडली.

रिपब्लिकन पक्षाने गरीब, दलित, शोषित, भूमिहीन लोकांसाठी कठोर संघर्ष केला आहे. या पक्षाला मोठा इतिहास आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यासारखे दिग्गज नेते या पक्षाचे प्रेरणास्थान असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.पक्ष बळकट करण्याचा निर्धारही कार्यकर्ते यांनी  यावेळी व्यक्त केला
या बैठकीत पक्ष संघटनांसह तालुक्यातील जनतेच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. देशातील लोकशाहीसोबतच दलित मागासवर्गीयांचे अस्तित्व धोक्यात असल्याने येत्या निवडणुकीत पुरोगामी शक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला असून दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला बळ देणे अत्यंत आवश्यक आहे. 

मेळाव्यात अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. 
या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वडसा शहराध्यक्षपदी प्रमेश बोदेले तर तालुका उपाध्यक्षपदी विपीन गणवीर यांची निवड करण्यात आली यावेळी चिंतामण सांगोळे, शिशुपाल वालदे प्रमिला शेंडे ,उत्तरा लाडे , लीलाबाई शामकुवर, विपिन गणवीर,विजया राऊत, यशोधरा मेश्राम, अनिता बोरकर आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !