आलापल्ली परिसरातील शालेय मुलींचा प्रवास झाला सुकर, मुलींच्या चेहऱ्यावर झळकला आनंद

0
आलापल्ली परिसरातील शालेय मुलींचा प्रवास झाला सुकर,
मुलींच्या चेहऱ्यावर झळकला आनंदआलापल्ली:-
येथील धर्मराव हॉयस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय,आलापल्ली येथे मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा धर्मराव शिक्षण मंडळ अहेरीचे श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज व कोषाध्यक्ष कुमार अवधेशराव  बाबा यांच्या हस्ते सायकल वितरण करण्यात आले.बाहेर गावावरून विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्याकरिता मोठी अडचण निर्माण होत होती
शालेय शिक्षण घेण्यासाठी त्यांना पाच किमी अंतर पायी जावे लागत होते त्यामुळे शाळेच्या उपस्थितीवर परिणाम होत होता. मानव विकास मिशन अंतर्गत ५८ सायकलचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे प्राचार्य  कोडेलवार, पर्यवेक्षक खोब्रागडे, सहाय्यक शिक्षक वैद्य, खनगन, मामीडपल्लीवार, खरवडे,  राऊत , सौ. किरंगे, बांबोडे ,टिपले , झिलकलवार, ताजने, उपलवर  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !